बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असतात. ५०शीतील एक गरोदर स्त्री ते ९० वर्षांच्या आजी, प्रत्येक भूमिका त्यांनी उत्तम प्रकारे साकारली आहे. नीना गुप्ता या बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या सोशल मीडियावर त्याच्या कामाबद्दल,खासगी आयुष्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी फॅन्ससोबत शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या टोनी कक्कर अणि नेहा कक्कर यांच्या प्रसिद्ध ‘कोका कोला’ या गाण्यावर एक रशियन डान्सरसोबत डान्स करताना दिसत आहेत. यात निना यांनी पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा बोल्ड लूक आणि डान्स चाहत्यांना आवडत आहे. ते कमेंट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. नीना यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शन दिलं, “और अब रूप परिवर्तन”.
View this post on Instagram
नीना गुप्ताच्या या बोल्ड लूक आणि डान्सने नेटकाऱ्यांना वेड लावले आहे. याआधी देखली नीना यांनी अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. तो दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘यात्रा’ या (१९८६) मिनी सीरिजचा होता.
View this post on Instagram
नीना यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दैल १००’या चित्रपटात त्या प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. यातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळताना दिसत आहे. याच बरोबर त्या अनुपम खेर सोबत ‘शिव शास्त्री बालोबा’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. दरम्यान नीना गुप्ता यांनी त्यांच आत्मचरित्र ”सच कहूं तो’ प्रकाशित आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी अनेक खासगी गोष्टींचे खुलासे केले आहेत.