Riteish Deshmukh- Genelia Deshmukh Viral Video: रितेश देशमुख व जिनिलिया हे खऱ्या अर्थाने कपल गोल्स आहेत. एकमेकांसह २१ वर्ष राहूनही या क्युट कपलमधील प्रेम व गोडवा कमी झालेला नाही. वेड चित्रपटात रितेश- जिनिलियाच्या केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने पुन्हा जिंकून घेतली. आता हळुहळू वेडचं क्रेझ ओसरत असलं तरी या दोघांच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. याच फॅन्ससाठी रितेश- जिनिलिया पुर्वीसारखच इंस्टाग्रामवर व्हिडीओ करून मनोरंजन करत असतात. नवरा बायकोमधील गोड रुसवे- फुगवे रितेश- जिनिलियाच्या इंस्टाग्राम रील्समध्ये नेहमीच दिसून येतात. पण याच वादात आता जिनिलियाने चक्क रितेशच्या तोंडावर पाणी ओतलं आहे. यानंतर रितेशच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट, तू झुठी में मक्कारमधील ‘तेरे प्यार में’ गाणे लिप-सिंक करत रितेश जिनिलियाने एक मजेदार व्हिडिओ शेअर कला आहे. यात रितेश गात असतो आणि ‘भीगे’ हा शब्द ऐकताच जिनिलिया त्याच्यावर पाणी ओतते. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे “तेरे प्यार में २१ वर्षापासून…”

जिनिलियाने रितेशच्या तोंडावर ओतलं पाणी

हे ही वाचा<< २५ वर्षांपासून तारक मेहता फेम अभिनेत्रीचं कुटुंब डोंबिवलीत चालवतं दुकान; लहान बहीणही स्टार; Video केला शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रितेश जिनिलियाच्या वेडने आजवर ७० कोटींची कमाई केली आहे. रितेशचा वेड सिनेमा मालामाल झाला असून तो लवकरच १०० कोटींच्या क्लब मध्ये जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.