आगामी सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी २’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी उत्सुक असल्याचे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने म्हटले आहे.
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. ‘कहानी’मध्ये विद्या बालन एका गर्भवती स्त्रीच्या भूमिकेत आपल्या पतीचा शोध घेताना दिसली होती. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी २’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परमब्रता चॅटर्जी यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. पुढील महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात होत असून मी पुन्हा एकदा सुजॉय सोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे विद्या बालनने एका कार्यक्रमात सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘कहानी २’ च्या चित्रिकरणासाठी विद्या बालन उत्सुक
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'कहानी' या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 19-02-2016 at 16:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan excited to shoot kahaani