बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरबरोबरच्या आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सिद्धार्थ रॉय कपूरची एका उद्योनमुख तारकेबरोबर जवळीक वाढत असल्यामुळे विद्या आणि त्याच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या उद्योनमुख तारकेला चित्रपटात काम मिळावे, म्हणून सिद्धार्थ जातीने प्रयत्न करत असल्याचे देखील बोलले जात आहे. आपल्यात सर्व काही ठिक असून, एकमेकांबरोबर आपण आनंदाने राहात असल्याचे एका प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगत विद्याने या वृत्ताला पूर्णविराम दिला. याविषयी बोलताना ती म्हणाली, आम्ही एकमेकांच्या सहवासात आनंदी असून, आमच्यात कोणत्याही प्रकारचा तणाव नाही. तुमची निराशा झाल्याबद्दल खेद आहे. आपला कोणीतरी हितचिंतक अशाप्रकारच्या अफवा उठवत असल्याचे विद्याने सूचित केले आहे.

मतदानाच्या दिवशी आपण पतीसोबत का दिसलो नाही याचे उत्तर देताना विद्या म्हणाली, दोघांची नावे वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदवली असल्याने आपल्याला मत देण्यासाठी पालकांच्या घरी जावे लागले. परंतु त्या दिवसानंतर मतदानावेळी आपण सिद्धार्थबरोबर असल्याचे सांगायलादेखील ती विसरली नाही. २०१२च्या डिसेंबर महिन्यात विद्या आणि सिद्धार्थ रॉय कपूरने लग्नगाठ बांधली.