बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विद्युत हा अ‍ॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. विद्युत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, आता विद्युत भारतीय प्रेक्षकांसाठी एक रिअ‍ॅलिटी शो घेऊन येणार आहे. हा शो डिस्कव्हरी चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये विद्युत सुपरहीरोच्या शोध घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

‘इंडियाज अनलिमिटेड वॉरियर’ असे या रिअ‍ॅलिटी शोचे नाव आहे, ज्यामध्ये विद्युत सुत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. या शोमध्ये त्याच्यासोबत चार एक्सपर्ट असणार आहेत. नुकताच शोचा ट्रेलर व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सद्वारे लॉन्च करण्यात आला. विद्युत जामवालच्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकूण १६ स्पर्धक दिसणार आहेत. ज्यांची दोन टीममध्ये विभागणी केली जाणार आहे. या शोची खास गोष्ट म्हणजे या शोमध्ये मुला-मुलींची लढाई पाहायला मिळणार आहे, म्हणजेच या शोमध्ये एका बाजूला मुली आणि दुसऱ्या बाजूला मुलं असतील, यावेळी प्रत्येक कामात ते एकमेकांपेक्षा किती चांगले योद्धा आहेत हे सिद्ध करतील.

आणखी वाचा : “जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

शोच्या ट्रेलरची सुरुवात विद्युतपासून झाली. यानंतर मुलींनी केलेले काही स्टंट त्यात दाखवण्यात आले. पुढे मुला-मुलींमध्ये असलेली लढतही दाखवण्यात आली. यावेळी प्रत्येक मुलगी ही समोरच्या खेळाडूला जबरदस्त स्पर्धा देताना दिसते.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शोमध्ये विद्युत, त्याच्या चार एक्सपर्टसोबत मिळून सर्व स्पर्धकांमध्ये असलेले पाच गुण शोधणार आहेत. फॉक्स, कंट्रोल, दृढनिश्चय, संतुलन आणि शिस्त हे ते पाच गुण आहेत. या शोमध्ये, प्रत्येक टास्क दरम्यान, सर्व स्पर्धकांना त्यांचे पाच गुण दाखवावे लागतील आणि जो स्पर्धक यात अयशस्वी ठरेल त्या स्पर्धकाला शोमधून बाहेर केले जाईल. तर स्पेशल गेस्ट अक्षय कुमार या शोमध्ये हजेरी लावणार आहे. ११ मार्च रोजी पहिला एपिसोड हा डिस्कव्हरी‌ प्लसवर प्रदर्शित होईल आणि डिस्कव्हरी‌वर हा एपिसोड १४ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.