scorecardresearch

“…त्यावेळी कोणी आवाज का उठवत नाही?” विवेक अग्निहोत्रींचा संतप्त सवाल

नुकतंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अप्रत्यक्षपणे या चित्रपटावर टीका केली आहे.

“…त्यावेळी कोणी आवाज का उठवत नाही?” विवेक अग्निहोत्रींचा संतप्त सवाल
विवेक अग्निहोत्री

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट गुरुवारी ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हा ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. या ट्रेंडचा आमिर खानला चांगलाच फटका बसला. त्यामुळे गेल्या १० वर्षातला आमिरचा हा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट असल्याचे बोललं जात आहे. या चित्रपटावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अप्रत्यक्षपणे या चित्रपटावर टीका केली आहे.
“६० वर्षांचा अभिनेता २० वर्षीय अभिनेत्रींसोबत रोमान्स करतो आणि…”, विवेक अग्निहोत्रींची आमिर खानवर अप्रत्यक्ष टीका

काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीने याबाबत एक ट्वीट केले होते. यात त्याने आमिर खाननंतर अभिनेत्री करीना कपूरवर टीका केली आहे. विशेष म्हणजे विवेक अग्निहोत्रींनी याबद्दल ट्वीट करताना बॉलिवूड असा हॅशटॅगही वापरला आहे. त्याने ट्वीट करत म्हटले की, “जेव्हा अशाप्रकारे चांगल्या आशयाच्या लघुपटांवर बॉलिवूडच्या डॉनकडून बहिष्कार टाकला जातो. समीक्षक छोट्या छोट्या मुद्द्यांवर विरोध करतात. तसेच मल्टीफ्लेक्समधून हे चित्रपट काढले जात आहे. तेव्हा मात्र त्याच्या चित्रपटामागील २५० गरीब लोकांचा कोणीही विचार करत नाही. त्यांनी तो चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली असते.”

“बॉलिवूडमध्ये स्वत:ला राजे समजणारे अनेक लोक जेव्हा बाहेरचे कलाकार, दिग्दर्शक आणि लेखकांचे करिअर उद्धवस्त करतात, त्यावर बहिष्कार टाकतात, बंदी घालतात, त्यावेळी कोणी आवाज का उठवत नाही? ज्या दिवशी सर्वसामान्य भारतीयांना बॉलिवूड डॉनचा हा अहंकार, फॅसिझम आणि हिंदूफोबिया कळेल, तेव्हा ते त्यांना गरमागरम कॉफीमध्ये बुडवतील.” असे विवेक अग्निहोत्रीने म्हटले आहे.

आमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vivek agnihotri takes a dig at kareena kapoor statement and laal singh chaddha actor aamir khan nrp

ताज्या बातम्या