भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक युद्धे झाली आहेत आणि प्रत्येक वेळी भारतीय सैन्याने उत्कटता, धैर्य व रणनीती यांच्या जोरावर इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक युद्धांचे चित्रण केवळ पुस्तकांमध्येच नाही, तर चित्रपटांमधूनही उत्तम प्रकारे केले गेले आहे. भारतीय चित्रपट उद्योगाने वेळोवेळी या युद्धांवर आधारित अनेक चित्रपट बनविले आहेत, जे देशभक्तीच्या भावनेने भरलेले आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका खास क्षणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती नेटफ्लिक्सवर तिचा स्वतःचा चित्रपट ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ पाहताना दिसत आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळातही हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील टॉप १० ट्रेंडमध्ये कायम आहे.
जान्हवीने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने हा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने हार्ट इमोजीसह ‘ओह हाय’ असे लिहून फोटो शेअर केला आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात जान्हवीने भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेनाची भूमिका साकारली होती, जी कारगिल युद्धादरम्यान जखमी सैनिकांना वाचविण्याच्या मोहिमेवर गेली होती. तिचे व्यक्तिमत्त्व केवळ आव्हानात्मक नव्हते, तर प्रेरणादायीदेखील होते.
जान्हवी कपूरने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. हे पात्र तिच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचे होते. हा चित्रपट पुन्हा पाहून तिने तिच्या मेहनतीच्या आणि त्या काळातील आठवणी ताज्या केल्या.
जान्हवीची ही इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. चाहते तिला पुन्हा अशाच एका दमदार भूमिकेत पाहण्याची आशा करीत आहेत. हा चित्रपट ‘कारगिल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयएएफच्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर बनविण्यात आला आहे. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान, ‘चीता’ हे हेलिकॉप्टर १८,००० फूट उंचीवर उडवले गेले होते. मग त्यांनी जखमी सैनिकांना द्रास आणि बटालिक येथील उंच टेकड्यांवरून उचलले आणि सुरक्षित ठिकाणी परत आणले.
या चित्रपटात जान्हवी कपूरव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार सिंग, मानव विज, मनीष वर्मा, आयशा रझा मिश्रा हे कलाकार होते. अंगद बेदी गुंजनचा भाऊ अंशुमनच्या भूमिकेत दिसला होता; तर पंकज त्रिपाठी यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू, अपूर्व मेहता व झी स्टुडिओ यांनी संयुक्तपणे केली आहे. चित्रपटाची कथा निखिल मेहरोत्रा आणि शरण यांनी मिळून लिहिली होती.