अभिनेत्री सारा अली खान जितकी सोशल मीडियावर चर्चेत असते तितकीच ती तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत येत असते. ‘केदारनाथ’ चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये दाखल झाली. सुशांत सिंह बरोबर ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यानंतर ‘लव्ह आजकल २’, ‘अतरंगी रे’, ‘कुली १’ सारखे चित्रपट तिने केले. विनोदी भूमिका, रोमँटिक भूमिका यशस्वीरित्या केल्यानंतर ती आता एका स्वातंत्र्यसेनानीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारा अली खानचे नाव शुबमन गिलशी जोडलं जात आहे. दोघांच्या डिनर डेटचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुकरलाशी शुबमनचं नाव बऱ्याच काळापासून जोडलं जात होतं. मात्र सारा अली खानचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले होते. आर्यन खान आपला क्रश आहे अशी कबुली देखील तिने दिली होती.

अभिनेत्री सारा अली खान दिसणार देशभक्तीपर चित्रपटात, साकारणार ‘ही’ भूमिका

अभिनेत्री सारा अली खानने नोव्हेंबर २०१८ मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ६’ या चॅट शोमध्ये आपल्या खाजगी आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी उघड केल्या होत्या. करण जोहरने तिला प्रश्न विचारला होता की ‘तुला लग्न कोणासोबत करायचे आहे? आणि कोणासोबत डेटवर जायचे आहे’? साराने क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिले होते की ‘मला रणबीर कपूरसोबत लग्न करायचे आहे आणि डेटवर कार्तिक आर्यनसोबत जायचे आहे’. तिच्या या उत्तरावर करण जोहर देखील आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत बसला.

या भागात सारा आपल्या वडिलांसोबत म्हणजे सैफ अलीखान सोबत सहभागी झाली होती. रणबीरने नुकतेच लग्न केले आहे. ‘लव्ह आजकल’ २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा सारा अली खान आणि कार्तिक आर्यन डेट करत आहेत अशा अफवा उठल्या होत्या. आज दोघे स्टार आपापल्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. सारा विक्की लक्ष्मण उतेकरच्या चित्रपटात कौशल आणि विक्रांत मॅसीसोबत काम करणार आहे. ती करण जोहरच्या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When actress sara ali khan revealed she wants to marry ranbir kapoor spg
First published on: 30-08-2022 at 13:16 IST