बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमारची लव्ह स्टोरी ही सगळ्यांनी माहित आहे. मात्र, रवीना अजय देवगणसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. खरतरं एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि अजयचे आणि तिचे लव्ह लेटर्स हे तिच्याकडे आहेत असे रवीना म्हणाली होती. दरम्यान, एका मुलाखतीत अजयने या गोष्टीला पब्लिसिटी स्टंट म्हटलं होतं.

या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही १९९४ मधील ‘दिलवाले’ चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटात रवीना आणि अजय एकत्र काम करत होते आणि त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अजयने करिश्मा कपूरसाठी रवीनाशी ब्रेकअप केला. ब्रेकअप झाल्यानंतर त्यादोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात होते.

रिपोर्ट्सनुसार, रवीना इतकी दु: खी झाली होती की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्यावेळी अजयने तिला मानसोपचारतज्ञ्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे स्पष्ट करण्यासाठी रवीना म्हणाली की त्यादोघांनी एकमेकांना प्रेम पत्र लिहिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

तर अजयने ‘फिल्मफेअर’ला एक मुलाखत दिली होती. “पत्र? हा! कोणते पत्र? त्या मुलीला सांगा की ते पत्र प्रकाशित कर, मला ती पत्र वाचण्याची इच्छा आहे! आमचे कुटुंब एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहोत. ती आमच्या घरी यायची कारण ती माझी बहिण नीलमची मैत्रिण आहे. जर तिने नीट वागायचे बंद केले, तर आम्ही तिला बाहेर काढू शकत नाही. मी कधीच तिच्या जवळ गेलो नाही. मी कधी तिला कॉल केला असेल किंवा तिच्या जवळ गेलो असेल तर तिला विचारा. तिचं नाव माझ्या नावाशी जोडून ती प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला हे देखील खोटं आहे ती फक्त प्रसिद्धीसाठी करत आहे.”

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

रवीनाने असे खोटे दावे सिद्ध करण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न अजयला विचारता अजय म्हणाला,” मला माहित नाही. कदाचित हेच आहे की मला तिच्याबद्दल कधीच काही वाटले नाही. मी तिच्या प्रेमात पडलो नाही.”