‘आयर्नमॅन’ आहे ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचा चाहता, चित्रपट पाहून म्हणाला ‘हा भारताचा…’

रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने एका मुलाखतीत त्याच्या आवडत्या बॉलिवूड कलाकाराविषयी सांगितले.

robert downey jr, aamir khan
आमिर खान हा बॉलिवूडचा टॉम हँक्स असल्याचे रॉबर्ट डाऊनी ज्युनियर म्हणाला आहे.

हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याला जेव्हा कधी भारताबद्दल विचारलं जातं तेव्हा तो भारतीयांची स्तुती करताना दिसतो. यावेळी त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानची स्तुती केली आहे. आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची त्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले आहे.

२०१० मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने ‘बॉम्बे टाईम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने भारतीय चित्रपटांवर भाष्य केलं आहे. “मी बॉलिवूड चित्रपट आवडीने पाहातो. परंतु त्यामध्ये मला आमिर खानचे चित्रपट जास्त आवडतात. ‘लगान’ हा चित्रपट पाहून मी त्याचा फॅन झालो. त्याने या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे. त्याला पाहून मला टॉम हँक्स आठवतात. मी तर आमिरला बॉलिवूडचा टॉम हँक्सच म्हणेन. जर संधी मिळाली तर मला आमिरसोबत काम करायला नक्की आवडेल.”

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

टॉम हँक्स हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. ‘फॉरेस्ट गम्प’, ‘कास्ट अवे’, ‘कॅप्टन फिलिप्स’, ‘कॅच मी इफ यु कॅन’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना आपल्या जबरदस्त अभिनयासाठी दोन वेळा ऑस्कर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

आणखी वाचा : ‘फोटोग्राफर आमिर खान असेल’, बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल

विशेष म्हणजे आमिर आता टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच नाव लाल सिंग चड्ढा आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्या अभिनेता नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When robert downey jr praise aamir khan lagaan said he is tom hanks of india dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या