Shilpa shirodkar breaks silence of having an affair with Sachin tendulkar before his marriage : शिल्पा शिरोडकर हे चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे, ज्याने ९० च्या दशकात तिच्या अद्भुत अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले.
अलीकडेच शिल्पा शिरोडकर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या पतीबद्दल आणि लग्नाबद्दल चर्चा केली आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीच्या शिक्षणाबद्दल आणि मुंबई सोडण्याच्या निर्णयाबद्दलही सांगितले आहे.
तसेच शिल्पा शिरोडकरने तिच्या करिअरबद्दल खूप काही सांगितले. पण, आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील त्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जेव्हा शिल्पाचे नाव क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी जोडले गेले होते.
असे म्हटले जाते की अंजलीशी लग्न करण्यापूर्वी सचिन शिल्पाला डेट करत होता. पण, याचा कोणताही पुरावा नाही आणि दोघांपैकी कोणीही हे स्वीकारलेले नाही. शिल्पाने युकेचा सर्वोत्तम बँकर अपरेश रणजीतशी लग्न केले आहे आणि सचिनदेखील त्याची पत्नी अंजली तेंडुलकरबरोबर आनंदी आहे.
दोघांनीही नात्याला दिलेला नकार
सचिन तेंडुलकर आणि शिल्पा यांची नावे खूप जोडली गेली होती, पण ते कधीच एकत्र दिसले नाहीत. रेड एफएमला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने सचिनबरोबरच्या तिच्या अफेअरच्या बातम्यांवरही मौन सोडले होते. अभिनेत्रीने सांगितले की ती १९९१ मध्ये ‘हम’ चित्रपट करत असताना सचिनला भेटली होती. सचिन वांद्र्यात शिल्पाच्या चुलत भावाबरोबर क्रिकेट खेळत असे आणि त्यांची तिथे भेट झाली. याबरोबरच शिल्पाने सांगितले की, जेव्हा ती सचिनला भेटली तेव्हा तो आधीच अंजलीला डेट करत होता.
शिल्पा म्हणाली होती, “मी जेव्हा ‘हम’ करत होते तेव्हा मी सचिनला पहिल्यांदा भेटले, कारण माझा चुलत भाऊ सचिन जिथे राहत होता तिथेच राहत होता. सचिन आणि माझा चुलत भाऊ वांद्रे पूर्वेला एकत्र क्रिकेट खेळायचे. अशा प्रकारे मी सचिनला भेटले आणि सचिन त्यावेळी अंजलीला डेट करत होता, जे कोणालाही माहीत नव्हते. आम्ही सर्वजण मित्र होतो म्हणून आम्हाला माहीत होते. कारण एक अभिनेत्री एका क्रिकेटपटूला भेटते आणि तो सचिन तेंडुलकर होता, त्यामुळे लोकांना हे म्हणणे सोपे झाले आणि मी त्याला एकदाच भेटले होते.”
इंडिया टुडेला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही शिल्पा शिरोडकरबरोबरच्या त्याच्या कथित नात्याबद्दल बोलला होता. दोघेही महाराष्ट्रीयन असल्याने ही अटकळ सुरू झाली. मुलाखतीत सचिनला विचारण्यात आले की त्याने स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मूर्खपणाची गोष्ट कोणती आहे? उत्तरात त्याने शिल्पा शिरोडकरबरोबरच्या त्याच्या कथित प्रेमसंबंधाबद्दल बोलला. त्याने शिल्पाबरोबरच्या त्याच्या नात्याला पूर्णपणे नकार दिला आणि असेही म्हटले की तो तिला ओळखत नाही.
सचिन आणि अंजलीचा प्रेमविवाह झाला होता. अंजली त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आणि दोघांचीही भेट मुंबई विमानतळावर झाली होती. शिल्पाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००० मध्ये अपरेश रणजीतशी लग्न केले. शिल्पाने दीड दिवसांत लग्नाला होकार दिला होता.
शिल्पाच्या मृत्यूची खोटी अफवा
शिल्पा शिरोडकरचे नाव सध्या चर्चेत आहे, कारण अभिनेत्रीने खुलासा केला आहे की एकदा तिच्या मृत्यूची खोटी अफवा पसरली होती. शिल्पाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर तिचे कुटुंब खूप नाराज झाले होते.