बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. सलमानचे लाखो चाहते आहेत. सलमानला नेहमीच त्याच्या लग्ना विषयी प्रश्न विचारण्यात येतो. पण तो याविषयी फारस बोलताना दिसत नाही, पण एकदा सलमानने दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Coffee With Karan) या चॅट शोमध्ये याबद्दल चर्चा केली होती. सलमानने करणच्या अशाच एका प्रश्नावर दिलेले उत्तर ऐकूण सगळ्यांना आश्चर्य झाले होते.

२०१३ मध्ये सलमानने करणच्या शोमध्ये हजेरी लावली होती. शो दरम्यान, सलमानने त्याच्या जुन्या रिलेशनशिप्सबद्दल देखील सांगितले. तर, शो दरम्यान सलमानने जो दावा केला त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झाले. सलमानने तो व्हर्जिन असल्याचा दावा केला होता आणि लग्नासाठी तो स्वतःचं (कौमार्य) हे होणाऱ्या पत्नीसाठी वाचवून ठेवले असल्याचे म्हणाला. सलमानच्या या कमेंटवर करण जोहर हसू लागला तर सलमानच्या काही चाहत्यांना हे खरे असल्याचे म्हटले.

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?

सलमानच्या चाहत्यांनी ही व्हर्जिनिटीवर असलेली त्याची कमेंट कशी खरी मानली याचे करण जोहरलाही आश्चर्य वाटले. या एपिसोडनंतर करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले की, ‘सलमान जेव्हा त्याच्या व्हर्जिनीटीवर बोलत होता तेव्हा तो विनोद करत होता. सलमानची विनोदबुद्धी अप्रतिम आहे. लोकांनी हे सत्य म्हणून स्वीकारले आहे यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही काहीही बोललात तरी ते त्यावर विश्वास ठेवतात हे विचीत्र आहे.

आणखी वाचा : मे महिन्यात या ५ राशीच्या लोकांना मिळेल अमाप संपत्ती, कुबेर देवाचा राहील आशीर्वाद !

त्यानंतर कॉफी विथ करणच्या १०० व्या एपिसोडमध्ये सलमानने हजेरी लावली होती. त्यावेळी सलमान त्याचा भाऊ अरबाज आणि सोहेल खानसोबत दिसला. त्यावेळी पुन्हा एकदा करणने सलमानला प्रश्न विचारला ‘मग, तू अजूनही व्हर्जिन आहेस का?’ यावर उत्तर देत सलमान म्हणाला, “हो, आतापर्यंत काहीही बदलले नाही.”

आणखी वाचा : नवरीने नवरदेवाला पाण्यात धक्का देण्याच्या प्रयत्नात घडले असे काही, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : ‘शेर शिवराज’चा जगभर डंका, भारतात १००० तर परदेशात १०० शोज हाऊसफुल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान सगळ्यात शेवटी ‘अँटीम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात आयुष शर्मासोबत दिसला होता. आता तो त्याच्या सुपरहिट फ्रेंचाइजी ‘टायगर ३’ मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. याशिवाय सलमान शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच तो त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करणार आहे.