मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही काही दिवसांपूर्वीच पुन्हा विवाहबंधनात अडकली. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली आहे. सध्या सोनाली ही तिच्या पतीसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे. सोनाली आणि कुणाल हे दोघेही मॅक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र सोनालीने नवऱ्यासोबत फोटो शेअर न केल्याने चाहत्यांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

सोनाली ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. कुणालसोबत पुन्हा लगीनगाठ बांधल्यानंतर ते दोघेही मॅक्सिकोमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. त्याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातील बहुतांश फोटोत सोनाली ही बिकीनी आणि मोनाकिनी परिधान केली आहे. तिच्या या फोटोंना अनेक लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे.

“काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली विवाहबंधनात

नुकतंच सोनालीने तिच्या हनिमूनचे आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तिने छान स्विमसूट परिधान केला आहे. एका बीचवर हटके फोटोशूट केलेले फोटो तिने शेअर केले आहेत. मात्र तिच्या या फोटोवर कमेंट करत एका चाहतीने हटके प्रश्न विचारला आहे.

सोनाली कुलकर्णी हनिमूनसाठी मॅक्सिकोमध्ये गेलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

‘तू तुझ्या नवऱ्यासोबत फोटो का शेअर करत नाहीस?? आम्हाला त्यालाही बघायला आवडेल’, असा प्रश्न एका चाहतीने सोनालीला विचारला आहे. त्यावर सोनालीनेही त्या चाहतीला टॅग करत ‘लवकरच’ असे म्हटले आहे.

त्या चाहतीने विचारलेला प्रश्न आणि सोनालीचे उत्तर सध्या चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोनालीने शेअर केलेले या फोटोला अनेक चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यावर ती सुंदर, छान दिसत असल्याचेही म्हटले आहे.

मोनाकिनी, हॅट आणि ‘अप्सरे’चा घायाळ करणारा लूक, सोनाली कुलकर्णीच्या तिसऱ्या हनिमूनचे फोटो पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ते दोघेही पुन्हा विवाहबंधनात अडकले. ‘काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.