हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ हा गेल्या काही दिवसांपासून ऑस्करमुळे चर्चेत आला होता. ऑस्करमध्ये ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथ पहिल्यांदा दिसला आहे. विल स्मिथ हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच विल स्थिथ भारतात आला आहे. त्याचे मुंबईच्या खाजगी विमानतळावरचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विल स्मिथचे हे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विल स्मिथ त्याच्या टीमसोबत दिसत आहे. त्यानंतर फोटोग्राफर्सला पाहताच तो हसत वेव करताना दिसतो. विल स्मिथ हा अध्यात्मिक गुरू सद्गुरूंचा शिष्य असून त्यांना भेटण्यासाठी तो भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे असे हे म्हटले जात आहे की तो त्याची पत्नी जेडा पिंकेट स्मिथपासून घटस्फोट घेणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

आणखी वाचा : “शूट करणं बंद करा…”, फोटोग्राफर्सवर संतापला तैमूर; पाहा व्हिडीओ

मिळाले माहितीनुसार, विल स्मिथ जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये थांबला होता. यापूर्वीही तो अनेकदा भारतात आला आहे. त्याने वाराणसीत गंगा आरतीलाही हजेरी लावली होती आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरुंचीही भेट घेतली होती. सध्या व्हायरल होत असलेल्या विरलच्या फोटोंमध्ये त्याच्या गळ्यात असलेली माळही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आणखी वाचा : “कृपया मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर…”, ‘शेर शिवराज’ प्रदर्शित होताच चिन्मय मांडलेकरने केली विनंती

आणखी वाचा : “कपाळावर टिकली का नाही?”, करीनाने हिंदूच्या सणांचा अपमान केल्याचा नेटकऱ्यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विल स्मिथ आणि त्याची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ यांच्या घटस्फोटाच्या चर्चा ही सुरु झाल्या आहेत. दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही आणि ते लवकरच कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत अशा चर्चा सुरु आहेत. यामागे ऑस्करमध्ये झालेली घटणा कारणीभूत असल्याचा अंदाज म्हटले जात आहे. तर विल स्मिथवर ऑस्कर अकादमीने त्याच्यावर १० वर्षांची बंदी घातली आहे.