कर्नाटकातील हिजाबच्या मुद्द्यावर अभिनेत्री झायरा वसीमने आपले मत मांडले आहे. झायराने कर्नाटकातील शाळांमधील हिजाबवरील बंदीवर टीका करणारी एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. हिजाबवर बंदी हा अन्याय असल्याचे तिने नमूद केले. तसेच धार्मिक बांधिलकीसाठी महिलांचा छळ होत असलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा तिने विरोध केला. जानेवारी महिन्यात सरकारी पीयू कॉलेजमधील सहा मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास मनाई केल्यापासून हा वाद सुरू झाला. सध्या या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला

झायरा वसीमने लिहिलंय की, “वारशात मिळालेला हिजाब ही निवड नाही. ही एक प्रकारची कल्पना आहे जी सोयीनुसार तयार केली गेलीय. इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक बंधन आहे. हिजाब परिधान करणारी एक स्त्री देवाने दिलेलं एक कर्तव्य पूर्ण करत आहे. ज्या देवावर ती प्रेम करते आणि ज्याच्यासमोर ती स्वतःला सादर करते. मी देखील हिजाब सन्मानाने आणि आदराने परिधान करतो. मी या व्यवस्थेला विरोध करते जिथे महिलांना धर्माच्या नावाखाली हे करण्यापासून रोखले जात आहे. मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणे, त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडायला लावणे आणि एक सोडायला लावणे हे अन्यायकारक आहे,” असं झायराने म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती पुढे लिहिते, “मी एक महिला म्हणून कृतज्ञता आणि नम्रतेने हिजाब परिधान करते. मुस्लिम महिलांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडणे हा अन्याय आहे. ज्या दोन गोष्टींमध्ये ही निवड केली जाते त्या पूर्णपणे भिन्न आहेत. तुम्ही तुमच्या अजेंड्यासाठी हे करत आहात. सक्षमीकरणाच्या नावाखाली हे सर्व करणे वाईट आहे, कारण यात सक्षमीकरणाची कोणतीही चर्चा नाही. हा एक मुखवटा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया झायराने दिली आहे.