09 August 2020

News Flash

अभिनेता अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण

अमिताभ यांच्यापाठोपाठ अभिषेकची करोना चाचणी पॉझिटिव्ह

अभिनेता अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्विट करुन अभिषेक बच्चनला करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करुन सांगितलं. त्यापाठोपाठ आता अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अभिषेक बच्चननेही केलं ट्विट

आज माझी आणि माझ्या वडिलांची म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्हा दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीही करोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो आहे असंही अभिषेक बच्चन यांनी म्हटलं आहे.

अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची आता कोविड चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करु यासाठी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 11:53 pm

Web Title: abhishek bachchan tests positive for covid 19 scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 महानायक अमिताभ बच्चन करोना पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल
2 ऑनलाइन संगीत विश्वात नव’चैतन्य’ आणणारा अवलिया
3 मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
Just Now!
X