News Flash

वाणी कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

वाणीने धार्मिक भावना दुखावल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे

वाणी कपूर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री वाणी कपूर हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी वाणीने इन्स्टाग्रामवर तंग कपडे घातलेला फोटो शेअर केला होता. तिने परिधान केलेल्या कपड्यांवर ‘हे राम’ नावाची प्रिंट होती. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, हे राम नावाची प्रिंट घातल्यानंतर वाणी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. त्यामुळे तिने हा फोटो डिलीटदेखील केला होता. मात्र काही नेटकऱ्यांनी पुन्हा तिचा फोटो शेअर केला. इतकंच नाही तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिच्याविरोधात मुंबईमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या रमा सावंत या महिलेने एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिलेने धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, वाणी कपूरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

वाचा : मिलिंद सोमणचा हा लूक कोणाप्रमाणे वाटतो?; तुम्हाला काय वाटतं..

दरम्यान, वाणी कायम तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते. वॉरमधील तिच्या बोल्ड लूकची विशेष चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही ती अशाच स्वरुपाचे फोटो शेअर करत असते. अनेक वेळा चाहत्यांची वाहवाह मिळवणारी वाणी यावेळी मात्र चांगलीच ट्रोल झाली.  तिने परिधान केलेल्या कपड्यांवर ‘हे राम’ नावाची प्रिंट होती. त्यामुळेच तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावं लागलं होतं. अनेकांनी धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत तिला खडे बोल सुनावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 10:55 am

Web Title: complaint filed against vaani kapoor for hurting religious sentiments by wearing vulgar top with ram print ssj 93
Next Stories
1 मिलिंद सोमणचा हा लूक कोणाप्रमाणे वाटतो?; तुम्हाला काय वाटतं..
2 प्रेग्नंसीनंतर ‘या’ अभिनेत्रीला मिळेना काम
3 गुड न्यूज : अ‍ॅव्हेंजर्समध्ये संपलेला ‘आयर्नमॅन’ परतणार
Just Now!
X