News Flash

१९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्यात येणार होता.

गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाबाबत चर्चा होत असतानाच आता विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रि या राबवली जात आहे. स्थानकांतील प्रत्यक्षात कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होईल.

ठाणे, डोंबिवली, शहाड स्थानकांचा समावेश; ‘एमआरव्हीसी’कडून विकास आराखडा कामासाठी निविदा प्रक्रि या

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्यात येणार होता. मात्र टाळेबंदीमुळे ही कामे रखडली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाबाबत चर्चा होत असतानाच आता विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. स्थानकांतील प्रत्यक्षात कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होईल. या स्थानकांत मोठय़ा प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

प्रवाशांच्या तुलनेत उपनगरी स्थानकातील सुविधा अपऱ्या आहेत. अरूंद फलाट, फलाटांवरील जागा अडवणारे स्टॉल यांमुळे प्रवाशांना चालणेही कठीण होते. त्यात अपुरे पादचारी पूल, सरकते जिने, प्रसाधनगृहांची कमतरता व त्यांची स्वच्छता असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळेच एमआरव्हीसीमार्फत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह एकूण सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह चार आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यांसह एकूण आठ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे स्थानकांवर अनेक सुविधांची भर पडेल. प्रकल्पाबाबत गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी, तसेच नेमक्या कोणत्या सुविधा द्याव्यात इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी मार्च २०२० मध्ये सल्लागार नेमण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली. मात्र करोनामुळे जारी झालेल्या टाळेबंदीमुळे ही प्रक्रि या थंडावली. काही महिन्यांनी सल्लागार नेमल्यानंतर त्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. आता प्रत्येक स्थानकातील विकास कामांचा आराखडा तयार के ला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रि या सुरू आहे. आराखडा बनवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. ही कामे डिसेंबर २०२१ पासून सुरू  होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विकास काय होणार?

रेल्वे स्थानक हद्दीत जास्तीत जास्त मोकळी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न

फलाटावर प्रवाशांना वावरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील.

नवीन पादचारी पूल, अधिक सरकते जिने, लिफ्ट

पादचारीपूल आणि स्कायवॉक जोडण्याचा प्रयत्न व त्यात काही बदल

तिकीट खिडक्यांच्या, खाद्यपदार्थ स्टॉलच्या रचनेत बदल

चांगली आनसव्यवस्था आणि प्रसाधनगृहे

प्रवाशांसाठी उन्नत डेक

स्थानकात अधिक दिवे बसविणार

‘एमआरव्हीसी’कडून विकासित केली जाणारी १९ स्थानके

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा

हार्बर मार्ग

जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द

पश्चिम रेल्वे

मुंबई सेन्ट्रल (लोकल), खार रोड, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा

१९ उपनगरीय स्थानकांच्या विकासासाठी आराखडा बनवण्याचे काम के ले जाणार आहे. त्यासाठी निविदा काढून काम के ले जाणार असून त्याची प्रक्रि या सुरू आहे.

– रवी शंकर खुराना, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 1:08 am

Web Title: development of 19 railway station is delayed dd 70
Next Stories
1 आता २९ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण
2 सेनापती बापट मार्गाचा लवकरच कायापालट
3 रेल्वे परिसरातील गुन्हेगारांवर ड्रोनची नजर
Just Now!
X