गणेश विसर्जनासाठी पालिकेची चोख व्यवस्था

मुंबई : गिरगाव, दादर, जुहू चौपाटीपासून दूर राहणाऱ्या भाविकांना, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या विभागातील पालिकेच्या कृत्रिम तलावात अथवा मंडपातच व्यवस्था करून विसर्जन सोहळा उरकावा लागणार आहे. त्यांना चौपाटीवर जाता येणार नाही.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी पालिकेने मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव, फिरते कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध केली आहेत. चौपाटीपासून दोन किलोमीटर अंतराच्या आत राहणाऱ्यांनाच चौपाटीवर विसर्जनाची परवानगी आहे. गणेश विसर्जनासाठी यंदा पालिकेने नोंदणी बंधनकारक केली होती. पालिकेच्या काही प्रशासकीय विभागांच्या हद्दीत चौपाटी आहे. केवळ याच विभागांच्या हद्दीतील गणेशमूर्तीचे चौपाटीवर विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या अ‍ॅपवर तसा पर्याय देण्यात आला आहे. मात्र अन्य विभागांतील अ‍ॅपवर चौपाटीचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला नाही. यंदा केवळ गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मरिन लाइन्स, चिराबाजार आणि आसपासच्या परिसरातील गणेशमूर्तीना गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यास परवानगी आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्यांनाच चौपाटीवर विसर्जन करता येईल. अन्य विभागात राहणाऱ्या भाविकांनी जवळच्या कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन करावे, असे आवाहन ‘डी’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी के ले आहे.

विसर्जन व्यवस्था

’ गणेश विसर्जनासाठी गर्दी टाळण्यासाठी पालिकेने १६८ कृत्रिम तलाव, १७० मूर्ती संकलन केंद्र, ३७ फिरती विसर्जन स्थळे, ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे अशी एकूण ४४५ विसर्जन स्थळे उपलब्ध करण्यात आली आहेत.

’ चौपाटीवर ८९६ स्टील प्लेट, ७८ नियंत्रण कक्ष, ६३६ जीवरक्षक, ६५ मोटरबोट, ६९ प्रथमोपचार केंद्र, ६५ रुग्णवाहिका, ८१ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३६८ निर्माल्य कलश, २,७१७ अतिप्रखर दिवे, ४२ निरीक्षण मनोरे, ४५ जर्मन तराफा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

’ यंदा गणेश विसर्जन सोहळ्याचे व्यवस्थापन चोख व्हावे यासाठी ३,९६९ अधिकारी आणि १९ हजार ५०३ कर्मचारी असे २३ हजार ४७२ जणांना तैनात करण्यात आले आहे.