14 July 2020

News Flash

राज्यात आजपासून जिल्हांतर्गत एसटी सेवा

लाल क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणी परवानगी

संग्रहित छायाचित्र

लाल क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणी परवानगी

मुंबई : राज्यात २२ मेपासून जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरू होणार आहे. लाल क्षेत्र व प्रतिबंधित क्षेत्र (कं टेनमेंट झोन) वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये काही अटीशर्तीच्या अधीन राहून एसटी सुरू करत असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. २३ मार्चपासून एसटीची राज्यातील सेवा बंद आहे. मुंबई, ठाणे, पालघरमधून के वळ अत्यावश्यक सेवा दिली जात आहे, तर कामगारांसाठीही एसटी राज्याच्या सीमेपर्यंत चालवल्या जात आहेत.

प्रवासासाठी अटी

* सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत बस सेवा सुरू राहील.

’ प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.

’ सामाजिक अंतराचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के  प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

’ ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )

’ प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.

’  प्रत्येक  प्रवाशाने मास्क लावणे आवश्यक आहे.

लाल क्षेत्र

मुंबई महानगर प्रदेश, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती ही महापालिका क्षेत्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:47 am

Web Title: inter district st bus service in the state from today zws 70
Next Stories
1 चटईक्षेत्रफळ अनियमिततेबाबत ठपका ठेवलेले उपमुख्य अभियंता समितीप्रमुख!
2 निर्जंतुकीकरणास विलंब
3 ‘बीकेसी’तील रुग्णालयात आजपासून बाधितांना दाखल करणार
Just Now!
X