मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, १७ सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

’कधी : रविवार, १७ सप्टेंबर २०१७

’कुठे : कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर, सकाळी ११-१५ ते दुपारी ४-१५ मि.पर्यंत

’परिणाम : सकाळी १०-४७ ते दुपारी ४-१४ या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप धिम्या व अर्धजलद गाडय़ा अप जलद मार्गावरून चालविल्या जातील. या गाडय़ा मुलुंडनंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळविल्या जातील. या दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर गाडय़ा थांबणार नाहीत. या मार्गावरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली येथून डाऊन धिम्या मार्गाने प्रवास करता येणार आहे. या कालावधीत सर्व अप आणि धिम्या जलद गाडय़ा कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. यामुळे गाडय़ा पंधरा मिनिटाने उशिराने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

’कधी : रविवार, १७ सप्टेंबर २०१७

’कुठे : पळसदरी ते खोपोली, सकाळी ९-४० ते दुपारी ४-४०

’परिणाम : सकाळी १०-५५, दुपारी १२-०५, दुपारी १.१५ आणि ३.२७ वाजता कर्जत ते खोपोली लोकल आणि सकाळी १०.२०, ११.३० दुपारी १२.४० आणि २.५० वाजता सुटणाऱ्या खोपली ते कर्जत गाडय़ा रद्द करण्यात येणार आहे. याचबरोबर सकाळी ७.५३ ते दुपारी १२.२२ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी खोपोली गाडी कर्जतपर्यंत चालवली जाणार आहे. तर दुपारी १.५०वाजता आणि सायं. ४.२८ वाजता सुटणारी खोपाली लोकल कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना होईल.

 हार्बर मार्ग

’कधी : रविवार, १० सप्टेंबर २०१७

’कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे अप मार्गावर ११.४० ते दुपारी ४.४०पर्यंत आणि डाऊन मार्गावर, सकाळी ११-१० ते दुपारी ४-१०पर्यंत.

’परिणाम : सकाळी ११-२१ ते दुपारी ४-३९ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल (डाऊन) आणि सकाळी ९.५२ ते दुपारी ४.४३ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रा/अंधेरी येथे सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक रद्द करण्यात आली आहे. तसेच सकाळी ९.५२ ते दुपारी ३.२६ पनवेल, बेलापूर आणि वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप) या मार्गावरील वाहतूक रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या मार्गावर विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर व मुख्य मार्गाने प्रवास करता येणार आहे.