25 February 2021

News Flash

पायाभूत सुविधांसाठी १२ हजार ९६९ कोटींची तरतूद

‘एमएमआरडीए’चा अर्थसंकल्प;  मेट्रो प्रकल्प, रस्ते, उड्डाणपूल, स्मारकांसाठी निधी

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढील आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १२ हजार ९६९ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्षांपेक्षा ही तरतूद २,८५०.१० रुपयांनी कमी आहे. पुढील आर्थिक वर्षांत ३,१३५.६ कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे. प्राधिकरणाची १५० वी बैठक मंगळवारी नगरविकासमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये २०२१-२२ च्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.

चालू आर्थिक वर्षांत एमएमआरडीएने १५ हजार ८१९ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजात ती ५ हजार ९६७ कोटी ५३ लाख रुपयांनी कमी करून ९,८५१.९२ कोटी रुपये केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या तुलनेत या वर्षीची तरतूद अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढील पाच वर्षांत एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई आणि महानगर परिसरात ३३७ किमी मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. विविध मेट्रो प्रकल्पांसाठी पुढील आर्थिक वर्षांत एकूण ७,२७०.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांपेक्षा मेट्रो प्रकल्पांवरील तरतूद केवळ ५३२.९५ कोटींनी वाढली आहे. यामध्ये या वर्षी सुरू होणाऱ्या मेट्रो २ ए (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) यासाठी १७००.१० कोटी रुपये आणि इतर मेट्रो प्रकल्पांसाठी ४,५७१.२५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर मेट्रो भवन, मेट्रो कर्मचारी निवासस्थाने, मेट्रो स्थानक नियोजन व बहुवाहतूक आरखडय़ासाठी तसेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रो ३ (कुलाबा-सीप्झ) मार्गिकेसाठी तरतूद आहे.

प्रादेशिक स्तरावर जलस्रोतांच्या विकास प्रकल्पासाठी ६१३.३५ कोटी, सिटीपार्क वांद्रे-कुर्ला संकुल ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान पादचारी झुलता पुलासाठी ७७.०५ कोटी व इतर प्रकल्पांसाठी ९८३.३५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. प्रशासकीय भांडवली खर्चाकरिता ५४८.६० कोटी रुपये तरतूद केली आहे.  प्राधिकरणाच्या बैठकीत २०१९-२० च्या वार्षिक अहवालास मान्यता दिली. तसेच मेट्रो २ बी आणि मेट्रो ७ च्या मार्गावरील स्थानक बदलास मंजुरी देण्यात आली. तसेच पूर्व द्रुतगती मार्गाचे पृष्ठभाग काम आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील कामांच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

  • मुंबई आणि महानगर परिसरातील विविध रस्ते प्रकल्प, उड्डाणपुलांचे काम सुरू असून विविध वाहतूक प्रकल्पांसाठी ४ हजार ६०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • यामध्ये मुंबई पारबंदर प्रकल्प (एमटीएचल), कलानगर उड्डाणपूल, सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोड जोडरस्ता, छेडानगर उन्नत मार्ग सुधारणा प्रकल्प आणि पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च आहे.
  • त्याचबरोबर एमयूआयपी (विस्तारित) प्रकल्पासाठी ७७६.८५ कोटी रुपये आणि मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाकरिता (एमयूटीपी) ४०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • बाळासाहेब ठाकरे स्मारक १०० कोटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक २६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:18 am

Web Title: mmrda budget provision of rs 12969 crore for infrastructure abn 97
Next Stories
1 महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांचे लोंढे
2 रामदेवबाबांच्या करोना औषधाला राज्याचा नकार
3 राज्यात मुस्लिमांसाठी आरक्षण लागू करा!
Just Now!
X