रेल्वेच्या विशेष गाडय़ांतून दोन दिवसांत साडेपाच हजारांपेक्षा जास्त प्रवासी दाखल

मुंबई : टाळेबंदीमुळे आलेल्या अडचणींमुळे गावाकडे जाणाऱ्या परप्रातीयांच्या प्रवासाची चर्चा संपत नाही तोच रेल्वेने १ जूनपासून सुरू के लेल्या विशेष गाडय़ांमधून अनेकांनी परप्रांतातून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरूही के ला. १ आणि २ जून या दोन दिवसात मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेने साडे पाच हजारपेक्षा जास्त प्रवासी मुंबई आणि आजुबाजूंच्या  उपनगरात दाखल झाले. मंगळवारीही रात्री उशिरार्पयंत विशेष गाडय़ा मुंबईत येत होत्या.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून ३१ मेपासून जशा परप्रांतात जाणाऱ्या गाडय़ा सुटत आहेत, तशा परप्रांतातून प्रवाशांना घेऊन अनेक गाडय़ा मुंबईत दाखलही होत आहेत. पहिल्या दिवशी मुंबईतून जाणाऱ्या गाडय़ाच अधिक होत्या. तुलनेत प्रवाशांचा मुंबईकडे येण्याचा ओघ कमी होता. परंतु, मोठय़ा संख्येने प्रवाशी मुंबईत दाखल होत आहेत. पश्चिम रेल्वेवर सोमवारी क्र मांक ०२९३३ अहमदाबाद ते मुंबई सेन्ट्रल गाडी दाखल झाली. या गाडीतून १,५११ प्रवासी दाखल झाले. त्यानंतर मंगळवारीही ही गाडी १,१५४ प्रवाशांना घेऊन आली. तर नवी दिल्ली ते मुंबई सेन्ट्रल ४३३ प्रवासी आणि जोधपूर ते वांद्रे टर्मिनस गाडीतून १,४१६ प्रवासी मुंबईत उतरले.

पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या गाडय़ा मुंबईत दाखल झाल्या आहेत. हैद्राबाद ते सीएसएमटी गाडी दाखल झाल्यानंतर कल्याण,दादर, सीएसएमटीपैकी दादर स्थानकातच ३५० प्रवासी उतरले. या गाडीतून एकू ण ६०० प्रवासी मुंबईत आले. याशिवाय क्र मांक ०६३४६ त्रिवेंद्रम ते एलटीटी गाडीनेही एकू ण ५१५ प्रवासी मुंबईत आले. यापैकी २७२ प्रवासी एलटीटीला उतरले. तर उर्वरित प्रवासी त्याआधीच्या पनवेल आणि ठाणे स्थानकात उतरल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

हजरत निजामुद्दीने एर्नाकु लम एक्स्प्रेस व्हाया कल्याण, पनवेलवरुन जाते. या दोन्ही स्थानकात अनुक्र मे ४४ व ३३ प्रवासी उतरल्याची माहिती दिली. मध्य रेल्वेवर दोन दिवसांत १,१९८ आणि पश्चिम रेल्वेवर ४५१४ प्रवासी उतरले.