31 October 2020

News Flash

राज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र प्रवास! विमानात राजकीय खलबतं ?

शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच विमानातून प्रवास करत आहेत. दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Raj And Pawar in flight

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच विमानातून प्रवास करत आहेत. दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे आज विदर्भ दौरा आटोपून औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

विमान प्रवासाआधी दोन्ही नेते औरंगाबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये उतरले होते. शरद पवार आणि राज ठाकरे यांचे एकाचवेळी औरंगाबादमध्ये येणे हे अचानक घडलेले नसून ही नियोजित भेट असण्याची दाट शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते काय रणनिती आखतात, त्यांच्यामध्ये कार्य चर्चा होते याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दोन्ही पक्षांचा विरोधक समान असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक वाढत चालली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा विरोधात महाआघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या महाआघाडीत मनसेला स्थान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे बोलले जाते. पण काँग्रेस मनसेबाबत अनुकूल नाहीय. त्यांचा मनसेला विरोध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 6:40 pm

Web Title: raj thackray sharad pawar is in same flight
Next Stories
1 मराठवाडय़ात पीकपाण्याअभावी शेतकऱ्यांची होरपळ
2 भाजपने अडगळीत टाकलेले मुद्दे शिवसेनेने उचलले!
3 मराठवाडय़ात पीकपाण्याअभावी शेतकऱ्यांची होरपळ
Just Now!
X