अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाच्या जामीनावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र,ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार, ही सुनावणी आज गुरुवारी होणार आहे, अशी माहिती रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली. तसंच एनसीबी करत असलेल्या तपासामध्ये बॉलिवूड ड्रग्स प्रकरणसमोर आलं असून यात अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशीसाठी समन्स जारी केले असून ती गोव्याहून मुंबईकडे रवाना झाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अमली पदार्थांचं सेवन आणि अन्य आरोपांखाली अटक केली आहे. त्यामुळे रियाने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला होता. तसंच तिच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली. या प्रकरणी रियाच्या जामीनावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली.त्यामुळे ही सुनावणी आज होणार आहे.

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं असून यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने दीपिकासह अन्य काही अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. त्यानुसार दीपिका मुंबईसाठी रवाना झाली आहे.