News Flash

माझी आई चेटकीण ; शीनाच्या नोंदवहीतील व्यथा

माझ्या जीवनात अनंत अश्रू आणि दु:ख आहे. माझे जीवन एकाकी आहे.

माझ्या जीवनात अनंत अश्रू आणि दु:ख आहे. माझे जीवन एकाकी आहे, सोबत कुणीच नाही. माझी आई चेटकीण आहे. भावना आणि संतापाचा हा उद्रेक शीना बोराने वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिलेल्या नोंदवहीत व्यक्त केला आहे.
शीनाने दहावीत असताना मनातील भावनांना नोंदवहीत वाट मोकळी करून दिली. शीना हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना गुवाहाटी येथील घरातून शीनाची नोंदवही सापडली आहे. नोंदवहीत वडिलांना उद्देशून तिने काही पत्रे लिहिली आहेत. पप्पा, तुम्ही मला बारावीच्या परीक्षेपूर्वी भेटायला नक्की या, मी तुमचे सगळे ऐकते, असे तिने त्यात लिहिले आहे. या पत्रात तिने आई इंद्राणीबद्दल प्रचंड तिरस्कार व्यक्त केला आहे. ती चेटकीण आहे असे तिने वडिलांना सांगितले आहे. आईने एका वृद्ध माणसाशी (पीटर मुखर्जी) लग्न केले आहे. मला तिची घृणा वाटते, असेही शीनाने नोंदवहीत लिहून ठेवले आहे. शीनाच्या या नोंदींतून ती एकाकी होती, असे जाणवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:20 am

Web Title: sheena bora expressed hatred for mother indrani in recovered diary
टॅग : Sheena Bora
Next Stories
1 राजकारण्यांवरील टीका यापुढे ‘देशद्रोह’?
2 डॉली बिंद्रासाठी आठवलेंचा आज मोर्चा
3 पेट्रोल-डिझेलवरील एलबीटीही रद्द होणार
Just Now!
X