मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत १८ किलो सोने जप्त केले आले असून, या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांना अटक केली आली. दोन्ही आरोपी केनियातील रहिवासी असून, त्यातील एक आरोपी विमान कंपनीचा कर्मचारी आहे. या आरोपी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सोने मुंबई विमानतळाबाहेर काढण्याचा कट आरोपींनी रचला होता. पण, त्यापूर्वीच सीमाशुल्क विभागाने आरोपींना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ९ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने गुरुवारी सापळा रचला होता. त्यात केनियावरून आलेला प्रवासी हसन दाहीर अली याला सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले. तो केनियातील नैरोबी येथून मुंबईत आला होता. केनियामध्ये एका व्यक्तीने सोने दिल्याचे त्याने चौकशीत मान्य केले. ते सोने हसनने विमान कर्मचारी इवान इम्बोयोका ओकाये याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार इवानकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात शुद्ध सोन्याच्या २१ लगड व सोन्याची भुकटी असलेले एक पाकीट जप्त करण्यात आले.

हेही वाचा – भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांच्या भूमिकेतही बदल

हेही वाचा – “अदाणी प्रकरणावरचे मौन हा तुम्हाला….” शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीकडून एकूण १७ किलो ८३० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ८ कोटी ९० लाख रुपये आहे. आरोपीने बॅगेमध्ये छुपा कप्पा तयार करून त्यात सोने लपवले होते. त्यानंतर धाग्याने ते शिवण्यात आले होते. इवान याच्यावर विमानतळावरून सोने बाहेर काढण्याची जबाबदारी होती. आरोपींना केनियातील मुख्य आरोपीने सोने दिले होते. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर मुख्य आरोपी त्यांच्याशी संपर्क साधणार होते. पण त्यापूर्वीच त्याला विमानतळावर पकडण्यात आले. त्यानंतर कायदोपत्री कारवाई पूर्ण करून शुक्रवारी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे सोन्याची तस्करी केली होती का? याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपासणी करीत आहे