scorecardresearch

मुंबई : गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

मानखुर्द येथे १२ वर्षांच्या गतीमंद मुलीवर ३८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार, तसेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली.

man rape girl Mankhurd
मुंबई : गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मानखुर्द येथे १२ वर्षांच्या गतीमंद मुलीवर ३८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार, तसेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला रविवारी पहाटे अटक केली.

हेही वाचा – दाभोलकर हत्या प्रकरण : तपासावरील देखरेखीबाबतचा निर्णय राखीव

हेही वाचा – Video : दोन तरुणींना बाइकवर बसवून तरुणाची स्टंटबाजी, व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनी…

पीडित मुलगी गतीमंद आहे, त्याचा फायदा उचलून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडित मुलीला द्राक्ष व खाऊ देण्याचे आमीष दाखवून आपल्या राहत्या घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलमांतर्गत बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक आरोपी राहत असलेल्या परिसरात रवाना झाले. त्यांनी आरोपीला शोधून रविवारी पहाटे अटक केली. आरोपी व्यापारी असून त्याचे दुकान आहे. पीडित मुलीची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 12:36 IST

संबंधित बातम्या