लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रेल्वे परिसरातील गर्दीमुळे अनेक लहान मुलांचा हात पालकांकडून सुटतो. प्रचंड रहदारीमुळे लहान मुलांची ताटातूट होते. त्यामुळे ही मुले स्थानक परिसरात फिरतात, किंवा एका कोपऱ्यात रडत बसतात. अशा मुलांना हेरून, त्यांची समजूत घालून, त्यांच्या पालकांचा शोध घेऊन, त्यांना स्वगृही पाठवण्याचे काम मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाने केले आहे. गेल्या तीन महिन्यांत रेल्वे परिसरात हरवलेल्या ५३८ मुलांची स्वगृही रवानगी करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. याशिवाय विविध मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलातर्फे मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबविण्यात येत आहे. रेल्वेच्या हद्दीत हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या मुलांची या मोहिमेअंतर्गत स्वगृही रवानगी केली जाते. १ ऑगस्ट २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरपीएफने ५३८ मुलांची स्वगृही रवानगी केली आहे. यामध्ये ३८४ मुले आणि १५४ मुलींचा समावेश आहे. ‘चाइल्ड लाइन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली.

आणखी वाचा-कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण अशक्य, पालिका आयुक्तांनी केली अभियंत्यांची कान उघडणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुटका करण्यात आलेल्या मुलांचे महिन्यानिहाय तपशील

महिना मुलेमुलीएकूण
ऑगस्ट९७ ५५ १४१
सप्टेंबर१२५ ३५ १६०
ऑक्टोबर८४ २९ ११३
नोव्हेंबर७८ ४६ १२४
एकूण मुले३८४
एकूण मुली१५४