आयएनएस चेन्नई या विनाशिकेवर कार्यरत जवानाचा गोळी लागल्यामुळे शनिवारी रात्री मृत्यू झाला. पिस्तुलातून चुकून गोळी झाडली गेली की ही आत्महत्या आहे याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. हॅप्पीसिंह नरेंद्रसिंह तोमर असे मृत जवानाचे नाव आहे. तो डॉकयार्ड लायन गेट येथील आयएनएस चेन्नई या विनाशिकेवर तैनात होता.

हेही वाचा- मुंबई: दारू चोरल्याप्रकरणी दोघांना अंधेरी पोलिसांकडून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तोमर यांच्या पिस्तुलातून शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुटलेली गोळी त्याच्या छातीला लागली. छातीला गोळी लागून ती पाठीतून बाहेर आली. घटनेनंतर तोमरला आपत्कालीन केंद्र येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तोमरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पेटरी अधिकारी सारंग गुप्ता यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की अपघात याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.