मुंबई: चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीला तब्बल २० वर्षानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आयुब शेख असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील वास्तव्यास होता. मुलुंड पोलिसांनी २००४ मध्ये एका चोरीच्या गुन्ह्यात या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र नंतर तो न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.

हेही वाचा – मुंबईत स्वच्छतेचा जागर; स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी, मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन

हेही वाचा – Bombay High Court : उच्च न्यायालयाचा मुंबई विद्यापीठाला दणका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अनेक वर्षांपासून हा आरोपी नाव बदलून ठाणे आणि नवी मुंबई परिसरात राहत होता. याचदरम्यान पोलिसांना त्याचा मोबाइल क्रमांक मिळाला. गुन्हे शाखा कक्ष ७ च्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेत कळवा परिसरातून त्याला अटक केली. या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल असून गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीबाबत अधिक तपास करीत आहेत.