खुनाचा गुन्हा दाखल असलेले बिहार येथील दोन आरोपी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच जुहू परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.आरोपी सनतकुमार जयकुमार सिंग ऊर्फ शुभम सिंग (२२), सोनू कुमार विनय भारती ऊर्फ शुभम गिरी (२०) यांना ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

हेही वाचा >>>मनसे आणि भाजपाची युती? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल, चर्चांना उधाण

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हे दाखल असून त्यांचा शोध सुरू होता. हे दोघे आरोपी मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून शुभम सिंग (२२), शुभम गिरी (२०) या दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. यातील आरोपी शुभम सिंग याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून त्या गुन्हयात तो जामिनावर मुक्त झाला आहे. तसेच, याप्रकरणी अंबा पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांना आरोपी पकडल्याचे कळवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.