मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव गोदीतील एका ३१ वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केली. हा हनी ट्रॅपचा प्रकार असून याप्रकरणी एटीएसने आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनेक महिन्यांपासून समाज माध्यमावर एका महिलेशी चॅटिंग करीत होता. महिलेच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देत असल्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणारा आरोपी पैशांच्या बदल्यात आरोपी महिलेला समाज माध्यमावर गोपनीय माहिती पुरवित होता असा आरोप आहे

हेही वाचा – “कद्रू वृत्तीचा माणूस…”, एकनाथ शिंदेंचं कोस्टल रोडवरून टीकास्र; म्हणाले, “पूर्वीच्या सरकारचा…”

हेही वाचा – Coastal Road Inauguration: मुंबईचा कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार; उद्घाटनावेळी सरकारची मोठी घोषणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असल्याचा संशय आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून ती त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत होती, असा दावा एटीएसच्या सूत्रांनी केला आहे. यापूर्वीही डिसेंबरमध्ये, महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील माझगाव गोदीत काम करणाऱ्या २३ वर्षीय गौरव पाटीलला पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) एजंटसोबत गोपनीय माहिती सामायिक केल्याप्रकरणी अटक केली होती.