Baba Siddique Murder Case Zeeshan Siddique Statement : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे भागात हत्या झाली. लॉरेन्स बिष्णोई टोळीने ही हत्या केल्याचं समोर आलं. दरम्यान, या हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला बाबा सिद्दिकी यांच्या मुलाने म्हणजेच माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी दिलेल्या जबाबात १० बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) व दोन राजकीय नेत्यांची नावं नमूद केली आहेत. यापैकी एकजण राष्ट्रीय पक्षाचा नेता आहे तर दुसरे प्रादेशिक पक्षाचे विधान परिषद सदस्य आहेत. या लोकांचे वांद्रे येथील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांवरून बाबा सिद्दिकी यांच्याशी मतभेद होते असं झिशान यांनी त्यांच्या जबाबात नमूद केलं आहे. झिशान यांनी या १२ जणांवर कोणताही विशिष्ट आरोप केला नसला तरी या लोकांनी बाबा सिद्दिकींवर गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर वाईट पद्धतीने टीका केल्याचा उल्लेख झिशान यांनी केला आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

झिशान यांनी दावा केला आहे की त्यांच्या वडिलांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ दिली जाणार होती. मात्र त्याआधीच त्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांना शपथ देण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत म्हटलं आहे की झिशान सिद्दिकी यांनी उल्लेख केलेल्या नावांपैकी कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत. तसेच आम्ही हल्लेखोरांना पकडलं आहे. आतापर्यंतच्या तपासांत माहिती मिळाली आहे की अनमोल बिश्नोई हा या कटाचा सूत्रधार आहे.

जबाबात वांद्र्यातील बांधकाम व्यावसायिकांचा उल्लेख

झिशान यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे की “मी वांद्रे पूर्वेकडील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना भेटलो. या भागात दोन बिल्डर व एका प्रादेशिक पक्षाचे नेते पुनर्विकास करत आहेत. या तिघांनी रहिवाशांना सांगितलं होतं की त्यांचं ज्ञानेश्वर नगर भागातच पुनर्वसन केलं जाईल. परंतु, लेखी करारात बिल्डरने रहिवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. येथील नागरिकांचं शहरात इतरत्र कुठेही पुनर्वसन केलं जाईल असं लेखी करारात म्हटलं होतं. मग मी तिथल्या रहिवाशांना सांगितलं की तुम्ही कोणाच्याही दबावात येऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करू नका. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. एका बिल्डरने माझ्या वडिलांना (बाबा सिद्दिकी) सांगितलं की त्यांना जे करायचं असेल ते करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे वडील हत्येच्या काही तास आधी आघाडीच्या राष्ट्रीय पक्षाशी संबंधित व्यक्तीला भेटले”

माजी आमदार सिद्दिकी म्हणाले, “बांधकाम व्यावसायिकाच्या त्रासामुळे स्थानिक रहिवाशांनी माझ्या वडिलांशी संपर्क साधला होता. या परिसरातील १० बांधकाम व्यावसायिकांबाबत तक्रार आली होती. माझ्या वडिलांना डायरी लिहायची सवय होती. त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांना एका आघाडीच्या राष्ट्रीय पक्षाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीचं नाव डायरीत लिहून ठेवलं आहे. ती व्यक्ती त्या दिवशी माझ्या वडिलांना भेटली होती. मृत्यूच्या काही तास आधी माझ्या वडिलांचं त्या व्यक्तीशी बोलणं झालं होतं.