मुंबई : वांद्रे- वरळी सागरी सेतूवरील प्रवास सोमवार, १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मोटारींच्या एकेरी प्रवासाच्या पथकरात १५ रुपयांची, मिनी बसच्या करात ३० रुपयांची, तर ट्रक आणि बसच्या दरात ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोटारींच्या एकेरी प्रवासासाठी ८५ रुपयांऐवजी १०० रुपये मोजावे लागतील. तर मिनी बस, टेम्पोच्या एकेरी प्रवासासाठी १३० रुपयांऐवजी १६० रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी ट्रक, बसचा पथकर १७५ रुपयांवरून २१० करण्यात आला आहे.
सागरी सेतूच्या पथकरासंबंधीच्या करारानुसार पथकराच्या दरात वाढ करण्यात येते. त्यानुसार १ एप्रिल २०२४ पासून नवे पथकर लागू करण्यात येतील आणि ते ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थिर असतील.
मोटारींच्या परतीच्या प्रवासाला सध्या ४२.५० रुपये पथकर द्यावा लागतो. आता तो ५० रुपये करण्यात आला आहे. मिनी बस, टेम्पोच्या परतीच्या प्रवासासाठी ६५ रुपयांऐवजी ८० रुपये आणि ट्रक, बससाठी ८७.५० रुपयांऐवजी १०० रुपये मोजावे लागतील. ‘फास्टॅग’च्या परतीच्या पथकरात तसेच मासिक पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. मोटारींना मासिक पाससाठी आता पाच हजार रुपये, मिनी बस, टेम्पोसाठी आठ हजार रुपये आणि ट्रक, बससाठी आठ हजार रुपये पथकर भरावा लागेल.
एकेरी प्रवास (दर रुपयांत)
वाहन प्रकार जुने दर नवे दर
मोटारगाडी ८५ १००
मिनी बस, टेम्पो १३० १६०
ट्रक, बस १७५ २१०
परतीचा प्रवास
वाहन प्रकार जुना पथकर नवा पथकर
मोटारगाडी ४२.५ ५०
मिनी बस, टेम्पो ६५ ८०
ट्रक, बस ८७.५० १००
हेही वाचा…सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
फास्टॅग दैनंदिन पास
जुना पथकर नवा पथकर
मोटार २१२ २५०
मिनी बस, टेम्पो ३२५ ४००
ट्रक, बस २६२.५ ५२५
फास्टॅग परतीचा प्रवास
मोटार : १५०
मिनी बस, टेम्पो २४०
ट्रक, बस ३१५
हेही वाचा…आघाडीत तीन जागांचा तिढा; काँग्रेसच्या संतापाची मित्रपक्षांकडून दखल नाही
मासिक पास नवे दर
मोटार ५,०००
मिनी बस, टेम्पो ८,०००
ट्रक, बस १०,५००