मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त होणारी अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने दादरमधील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच आसपासच्या परिसरात नागरी सेवा-सुविधां उपलब्ध केल्या आहेत. अनुयायांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने काळजी घेण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस रविवारी सकाळी १० वाजता चैत्यभूमी येथे पुष्प अर्पण करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करतील. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात. अनुयायांना विविध प्रकारच्या नागरी सोयी-सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा…डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चैत्यभूमीतील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासोबतच सीसी टीव्ही कॅमेरे, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा या सुविधांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा…खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस, प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क

दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आले आहेत. उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.