मुंबईमधील कबुतरखान्यांच्या आसपास भिरभिरणारी कबुतरे अपघात आणि आजारांना कारणीभूत ठरत असल्याने कबुतरखाने बंद करण्याचा विचार पालिका करीत आहे.
मुंबईतील कबुतरखाने अनेक ठिकाणची ओळख बनले आहेत. चणे-बाजरीचे दाणे टिपण्यासाठी कबुतरांचे थवेच्या थवे तेथे येत असतात. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी कबुतरखाने असल्यामुळे भिरभिरणाऱ्या कबुतरांचा वाहतुकीला त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यात ग्रॅन्ट रोड येथून जात असलेले कनिष्ठ अभियंता एकनाथ जोंधळे यांच्या मोटरसायकलसमोर अचानक कबुतर आले आणि त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. त्यात त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे कबुतरखान्यांविरोधात संघटित आवाज उठू लागला आहे. कबुतरखान्याच्या आसपासच्या रहिवासांना कबुतरांचा कायम त्रास सहन करावा लागतो. तसेच परिसरात दरुगधी पसरून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कबुतरखाने बंद करण्याची मागणी वाढू लागली आहे. या संदर्भात पालिका सभागृहात होणाऱ्या चर्चेअंती कबुतरखाने बंद करण्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर विविध विभागांची ओळख बनलेले कबुतरखाने इतिहासजमा होतील.
कबुतरांचा वाहतुकीला त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. कबुतरखान्याच्या आसपासच्या रहिवासांना कबुतरांचा  त्रास सहन करावा लागतो. तसेच परिसरात दरुगधी पसरून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.