मुंबई : रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्या येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या लोकलला चिंचपोकळी, करी रोड येथे थांबा नसेल.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. यासह ठाणे – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल. ब्लाॅक वेळेत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली – राम मंदिर दरम्यान अप जलद मार्गावर, राम मंदिर – गोरेगाव दरम्यान डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे, सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावतील. ब्लॉकदरम्यान काही लोकल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येतील आणि हार्बर मार्गावर अंधेरी आणि बोरिवलीच्या काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.