मुंबई: गेले दोन दिवस ब्लाॅकमुळे प्रवाशांना वेठीस धरल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे लोकल रखडल्या. त्यामुळे मंगळवार सकाळी लवकर कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. एकीकडे धुक्यानी रेल्वेगाड्या आणि लोकलची वाट अडवली असतानाच तांत्रिक बिघाडामुळे लोकलचा खोळंबा झाला.

मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू असलेल्या रात्रकालीन ब्लाॅकमुळे गेले दोन दिवस प्रवाशांना प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तर, मंगळवारी आसनगाव – वासिंददरम्यान पुन्हा ब्लाॅक घेण्यात आला होता. या ब्लाॅकदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे पहाटे ५.३० च्या सुमारास सिग्नल यंत्रणेची तार तुटली. त्यामुळे लोकल, रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला.

हेही वाचा… राज्य कामगार विमा योजनेची रुग्णालये आरोग्य विभाग चालवणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी साधारण अर्धातास लागला. पहाटे ५.५८ च्या सुमारास तार जोडणीचे काम पूर्ण झाले. मात्र, कसारा येथून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल विलंबाने धावू लागल्या.