मुंबई : ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून नागपूर, कोल्हापूर, मडगाव दरम्यान १२ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रक्षाबंधनानिमित्ताने बहीण-भावाचा प्रवास सुकर होईल. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
सर्व रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीची क्षमता पूर्ण
राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्यामुळे सलग सुट्टीच्या वेळी कोकणासह विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने सीएसएमटी – नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या सहा फेऱ्या, एलटीटी – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या चार फेऱ्या, सीएसएमटी – कोल्हापूर विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.
सीएसएमटी-नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या
गाडी क्रमांक ०११२३ विशेष रेल्वेगाडी ९ ऑगस्ट रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहचेल.
गाडी क्रमांक ०११२४ विशेष रेल्वेगाडी १० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटी पोहोचेल.
सीएसएमटी – नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या चार फेऱ्या
गाडी क्रमांक ०२१३९ विशेष रेल्वेगाडी १५ आणि १७ ऑगस्ट रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०२१४० विशेष रेल्वेगाडी १५ आणि १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
सीएसएमटी-कोल्हापूर विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या
गाडी क्रमांक ०१४१७ विशेष रेल्वेगाडी ८ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४१८ विशेष रेल्वेगाडी १० ऑगस्ट रोजी दुपारी ४.४० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
एलटीटी-मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या
गाडी क्रमांक ०११२५ विशेष रेल्वेगाडी १४ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११२६ विशेष रेल्वेगाडी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.४० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल.
एलटीटी – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या
गाडी क्रमांक ०११२७ विशेष रेल्वेगाडी १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगावला पोहचेल. गाडी क्रमांक ०११२८ विशेष गाडी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १.४० वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल.