कुलाबा येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा मोबाईल व वॉकीटॉकी हिसकावणाऱ्या दोन तरूणांना कुलाबा पोलिसांनी अटक केली. आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुलाबा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई माणिकराव टोपले (३१) मंगळवारी बेस्ट जंक्शन जवळील एस. बी. एस. रोडवर तैनात होते. त्यावेळी आरोपी सुमीत कासारे व आदर्श पाटील यांनी टोपले यांचा वॉकीटॉकी आणि मोबाईल हिसकावून घेतला. तसेच टोपले यांना मारहाण व शिवीगाळ केली.

हेही वाचा >>>मुंबई: पुन्हा भूमिगत कचरापेट्या, कफ परेडमध्ये झाडांची कत्तल करून भूमिगत कचरापेट्यांसाठी जागा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर कासारे त्यांचा मोबाईल घेऊन पळून गेला. याप्रकरणी टोपले यांनी केलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून कासार याच्याकडून मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.