मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शतकमहोत्सवी मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या तंजावर, तामिळनाडू येथील सरस्वती महालात ठेवण्यात आलेल्या नाट्य वाङमयाला वंदन करुन करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले यांनी २२ मराठी नाटके लिहिली असून, १६९० साली ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे त्यांनी पहिले मराठी नाटक लिहिले.

या शंभराव्या नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आहेत. हा नाट्य वाङमय वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलन अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदी, गणेश वंदना, नटराज नृत्य व शाहराज राजे भोसले लिखीत ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ या नाटकातील प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करतील. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचा – रेल्वेचे महाव्यवस्थापक, व्यवस्थापकांची वाहने अद्यापही पेट्रोलवरच, रेल्वे मंडळाने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या सूचनांचा विसर

हेही वाचा – ई – सिगारेटवर संशोधनास डॉक्टरांना बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाटककार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून दिनांक २९ डिसेंबर रोजी सांगली येथे संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. त्यानंतर १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा आरंभ ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे होणार आहे.