मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)च्या फलाट क्रमांक १०-११ च्या विस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. १७ मे, शुक्रवारी रात्रीपासून ते १ जूनपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्री सहा तासांचा ब्लॉक असेल.
सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०-११ च्या विस्तारीकरणासाठी अभियांत्रिकी-विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंगची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्सासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. शुक्रवारपासून पुढील १५ दिवस रात्री १२.१४ वाजताची सीएसएमटी-कसारा लोकल शेवटची असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते भायखळा दरम्यान लोकल सेवा बंद राहील तर, रात्री ९.४३ वाजताची कर्जत-सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री १०.३४ वाजता सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल असेल. ठाण्याहून पहाटे ४ वाजताची सीएसएमटीकरिता पहिली लोकल असेल. पहिली सीएसएमटी-कर्जत लोकल पहाटे ४.४७ वाजता सुटेल.
हेही वाचा…मुंबई : कोणत्याही नवीन जाहिरात फलकांना तूर्तास परवानगी नाही, पालिका आयुक्तांचे स्पष्ट आदेश
दादर स्थानकापर्यंत येणाऱ्या रेल्वेगाड्या
लखनऊ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस , भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्स्प्रेस, होसपेट जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस ,हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या
सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस
हेही वाचा…मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीला उदयपूरमधून अटक
पनवेल स्थानकात रद्द आणि रवाना
सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यतच चालविण्यात येईल.