मुंबईः समाज माध्यमांवरून अश्लील चित्रफीत अपलोड करून ती हटवण्याच्या नावाखाली एका कलाकाराची खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार अंधेरी पश्चिम परिसरात घडला आहे. आरोपीने चित्रफीत हटवण्यासाठी लिंक पाठवून गोपनीय माहिती मिळवली. तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तक्रारदाराची रक्कम जमा झालेल्या बँक खात्याच्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार कलाकार, मॉडेल असून तो अंधेरीतील ओल्ड म्हाडा परिसरात राहतो. त्याला ३१ ऑगस्टला प्रिया पटेल या महिलेच्या अकाऊंटवरुन एक चित्राफित पाठवण्यात आली होती. त्यात त्याच्या चेहरा मॉर्फ करण्यात आला होता. त्या चित्राफितीद्वारे अज्ञात व्यक्तीने समाज माध्यमावर तक्रारदाराची बदनामी केली. या प्रकारानंतर तक्रारदाराला धक्का बसला. त्याची अश्लील चित्रफीत आरोपीने विविध समाज माध्यमांवर अपलोड केली होती. याच दरम्यान त्याला एका अज्ञात व्यक्तीने संदेश पाठवून अश्लील चित्रीत हटवायची आहे का अशी विचारणा केली. त्या चित्रफीतीमुळे प्रचंड बदनामी होत असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीला चित्रफीत हटवण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने त्याला एक लिंक पाठविली. ती लिंक उघडल्यानंतर तक्रारदाराने त्याची माहिती अपलोड केली. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहारांद्वारे एक लाख रुपये हस्तांतरीत झाले.

हेही वाचा >>>तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले; खारमध्ये गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अज्ञात व्यक्तीने अश्लील चित्रफीत हटवण्याचे आमिष दाखवून त्याला लिंक पाठवून त्याच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याने वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तेथे अज्ञात आरोपींविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.