मुंबई : ऑनलाईन शेअर बाजारात फसवणूक झाल्याने हताश झाल्याने २० वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तपास करून ३ महिन्यांनी फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. मुख्य सायबर भामट्यांचा शोध सुरू आहे.
मयत तरूण विजय ताटे (२०) हा तो पवई येथे राहतो. तो बारावीत शिकत होता. त्याने १७ जुलै रोजी घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकारम्यान रुळावर ट्रेनसमोर उडी मारून आम्हत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. सुरवातीला याप्रकरणी कु्र्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ऑनलाईन फसणूकीचा बळी
याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस तपास करत असताना विजयने ऑनलाईन शेअर बाजारात पैसे गुंतवले असल्याचे समोर आले.त्यानुसार पोलिसांनी तपास केला. सायबर भामट्यांनी विजयला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या सापळ्यात तो अडकला. त्याने तब्बल १ लाख ८० हजार रुपये गमावले होते.तो सायबर फसवणूकीचा तो बळी ठरला होता, असे पोलिसांनी सांगितले.
चार खातेदारांवर गुन्हा
फसवणूकीमुळे झालेल्या नैराश्यातून विजयने ट्रेनखाली आत्महत्या केली होती. पोलिसांनी ज्या खात्यात विजयने पैसे भरले होते. ती खाती शोधून काढली. याप्रकऱणी आतापर्यंत गोविंग अहिरराव, सुनिलकुमार मिश्रा, अमन अब्बास, हरजितसिंग संधू या ४ जणांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या विरोधात कुर्ला रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३१८ (२) ३(५) अंतर्गत फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी (११ ऑक्टोबर) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रधार मोकाट
सायबर भामटे लोकांना नफ्याचे आमिष दाखवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडतात आणि त्यांची फसवणूक करतात. विजय हा तरूण या फसवणूकीचा बळी ठरला असे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले. विजयने ज्या खात्यात पैसे भरले होते त्या ४ खातेदारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सायबर फसवणुकीचा मुख्य सूत्रधार आरोपी वेगळा असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत असे यादव यांनी सांगितले. ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे आणि अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.