Dahi Handi 2022 Celebration : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दादर येथील आयडियल गल्लीमध्ये उभारण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.गोविंदानी तीन थर उभे करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा क्षण, शिवरायांनी अफजल खानचा कोथळा काढल्याचे दृश्य सादर केला.

Dahi Handi 2022 : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान!

दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर मुंबईत धुमधडाक्यात दहीहंडी साजरी केली जात आहे. प्रत्येक गोविंदा पथकाकडून दोन वर्षांची कसर भरून काढली जात आहे. गोविंदा पथकांच्या कसरती, सादरीकरण लक्षवेधक ठरत आहे. मालाड पूर्वेकडील शिवसागर गोविंदा पथकाने या वर्षी थरावर थर रचून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा प्रसंग सादर केला.

Dahi Handi 2022 : ठाण्याला दहीहंडी उत्सवामुळे जत्रेचे रुप; नौपाड्यात दोन गोविंदा पथकांनी लावले नऊ थर!

शिवसागर गोविंदा पथकात १२० ते १५० हून अधिक मुले-मुली आहेत. रात्री दहा ते मध्यरात्री दोन-तीन वाजेपर्यंत सराव करुन दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना साकारतो. पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनात्मक संदेश पथकाद्वारे देतो, असे शिवसागर गोविंदा पथकाचे अध्यक्ष प्रतिक बोभाटे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दृष्टीहीन गोविंदा पथकानेही साजरा केला दहीकाला उत्सव –

दादरमधील आयडियल गल्ली येथे दृष्टीहीन आणि दिव्यांग मुलांनी दहीहंडीला सलामी देऊन दहीकालाचा उत्सव साजरा केला. नयन दृष्टीहीन गोविंदा महिला पथकाने यंदा दादरमध्ये तीन थर रचून दहिहंडीला सलामी दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित केलेल्या आयडियल पर्यावरणपूरक दहीहंडीत दिव्यांगांना ही थर रचण्यासाठी सहभाग घेतला.