मुंबई : देशातील शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी तीन वर्षांनंतर पुन्हा धावणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी नव्या रूपात आणि नव्या ढंगात सजवण्यात आली आहे.  गुरुवारी दुपारी १.३० वाजता डेक्कन ओडिसीचा लोकार्पण समारंभ होणार आहे. या गाडीची उद्घाटन फेरी सीएसएमटी ते ठाणे दरम्यान होणार आहे. 

हेही वाचा >>> मुंबई : गणेशोत्सव काळात रात्री बेस्टची अतिरिक्त बससेवा

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन ओडिसी २००५ मध्ये सुरू केली. मात्र मार्च २०२० मध्ये करोना आणि टाळेबंदी काळात या रेल्वेगाडीची सेवा खंडित झाली. त्यानंतर ती वाडीबंदर, दादर येथे धूळखात उभी होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या गाडीच्या अंतर्गत आणि बाह्य भागात अनेक नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रूपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे.

लोकार्पण समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्टय़े : मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डमध्ये डेक्कन ओडिसीला नवे रूप देण्यात आले. या गाडीला २१ डबे असून अंतर्गत भागात आलिशान सजावट, शाही रेस्टॉरंट, स्पा आणि लाऊंज सुविधा आहेत.