लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. याबाबतचा तपशीलवार आदेश नंतर दिला जाईल. मात्र, ममताची याचिका स्वीकारली जात असल्याचे न्यायालयाने तिला दिलासा देताना स्पष्ट केले. ममता हिचा गुन्ह्यात सहभाग होता हे सिद्ध करणारे पुरावेच नाहीत, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने तिची गुन्हा रद्द करण्याची मागणी मान्य करताना नमूद केले.

आणखी वाचा- मुंबई: इंजिनच्या धडकेत रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी ममतासह अन्य आरोपींविरोधात ठाणे येथील पोलिसांनी २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ममताने उच्च न्यायालयात याचिका केली होती. पती आणि प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याने केलेल्या कृत्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला याप्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा ममता हिने गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला होता.