मुंबई : अर्थसंकल्प सगळेच सांगतात. पण, ‘लोकसत्ता’ त्याचा अर्थही उलगडून सांगतो. दरवर्षी अभिनव संकल्पना घेऊन अगदी सोपेपणाने. अर्थशास्त्रातील रुक्ष संकल्पना आणि तांत्रिक बाबी यांच्या मांडणीतील साचे मोडून अर्थसंकल्पाचे अचूक वृत्त-विश्लेषण करण्याचा शिरस्ता ‘लोकसत्ता’ने गेली अकरा वर्षे पाळला आहे. यंदाही कल्पक मांडणीत पानापानांतून अर्थसार अनुभवायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करांचा गुंता, तुटीचे गणित, किचकट आकडय़ांची चळत आणि आलेखांची शर्यत यांतून आपल्या सगळय़ांच्या जगण्यात काय बदल होणार, याचे भाकीत आम्ही करतो. तसेच र्सवकष मुद्दय़ांना स्पर्श करीत अर्थसंकल्प सुगम बनवतो. यंदाही विविध क्षेत्रांतील अभ्यासक आपल्या लेखणीतून अर्थसंकल्पाचे सहज-सोपे विश्लेषण करणार आहेत. कधी रंगभूमीची भाषा घेऊन ‘संगीत अर्थकल्लोळा’च्या रूपात, कधी कवयित्री शांता शेळके यांच्या काव्यलयीत, कधी तुकारामांच्या रोकडय़ा अभंगांतून, तर कधी क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधत अर्थसंकल्पातील ‘सकल राष्ट्रीय आनंद’ दाखविणाऱ्या ‘लोकसत्ता’चा गुरुवारचा अंक यंदाच्या अर्थसंकल्पाच्या कल्पक मांडणीने आणि अर्थतज्ज्ञांच्या सहभागातून सादर होणार आहे.

हेही वाचा – यंदाचा अर्थसंकल्प सुख/ दु:ख देण्यापेक्षा, सुखाची आशा लावणारा…

यंदा नवे काय?

दरवर्षी ‘लोकसत्ता’ एकानव्या संकल्पनेद्वारे अर्थसंकल्प वाचकांपर्यंत पोहोचवतो.
करोना’ या महासाथीने तयार केलेल्या संज्ञा आणि परिभाषा हा गेल्या वर्षीचा विषय होता.
यंदाही वेगळय़ा संकल्पनेतून अर्थसंकल्पाचा मथितार्थ उलगडून दाखवला जाणार आहे.

विश्लेषक..

अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, वित्त विश्लेषक
डॉ. रूपा रेगे, शल्यविशारद डॉ. अविनाश सुपे, करसल्लागार प्रवीण देशपांडे, गुंतवणूक विश्लेषक अजय वािळबे, कर सल्लागार डॉ. दिलीप सातभाई, कृषी अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर, उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर, अर्थअभ्यासक अनिकेत सुळे, क्रियाशील अभ्यासक तारक काटे आणि इतर मान्यवर या विशेष अंकात सहभागी असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic picture with innovative concept budget tax amy
First published on: 29-01-2023 at 03:04 IST