मुंबई : साखर कारखान्यातील भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ईडीने मुश्रीफांना शुक्रवारी (ता. २४ मार्च) हजर राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा – धीरेंद्र शास्त्रींसंबंधीची अंनिसला दिलेली ‘ती’ नोटीस पोलिसांकडून रद्द, कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश

हेही वाचा – “उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर…”, संजय शिरसाट यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. ईडीने मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चाैकशीला हजर राहाण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. मुश्रीफांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मुश्रीफ हे दोनवेळा ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत. मुश्रीफांना शुक्रवारी पुन्हा चाैकशीला बोलावण्यात आले आहे. त्यानुसार ते वकिलांसह चाैकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोल्हापूरमधील कार्यकर्ते, शेतकरी सहभागी होणार होते. पण त्यांना वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतले.